भाजपच्या कार्यकर्त्यांचे वासिंद येथे आमरण उपोषण

March 18, 2011 12:03 PM0 commentsViews: 6

18 मार्च

मुंबई-आग्रा महामार्गावरील वासिंद गावामध्ये जाण्यासाठी महामार्ग प्रशासनाने जिंदाल कंपनीसमोर महामार्गावर उड्डाण पूल मंजूर केला होता. परंतु स्थानिक ग्रामपंचायतीनं तिथं पूल नको अशी भूमिका घेतली. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. ग्रामस्थांनी तो उड्डाणपूल व्हावा तसेच खातिवली क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी महामार्ग प्रशासनाकडे करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यासाठी अखेर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी वासिंद येथे आमरण उपोषण सुरु केले असून त्यांना सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

close