हसन अलीकडे 72 हजार कोटींची टॅक्सची थकबाकी

March 18, 2011 12:07 PM0 commentsViews: 2

18 मार्च

हसन अली हा देशातील सर्वात मोठी टॅक्सचोर असल्याचा ठपका कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. हसन अलीकडे 72 हजार कोटी रुपयांच्या टॅक्सची थकबाकी असल्याचे निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढण्यात आला आहे. हा रिपोर्ट संसदेत मांडला जाणार आहे. एकूण देशभरात सुमारे 2 लाख कोटी रुपयाची टॅक्स थकबाकी आहे. यापैकी 35 टक्के एकट्या हसन अलीकडे असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. आयकर खात्याने या करचोरी करणार्‍यावर 4 हजार 56 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्याऐवजी केवळ 706 कोटी रुपये आकारले असा ठपका या रिपोर्मध्ये ठेवण्यात आला आहे.

close