आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांचे 20 दिवसांपासून उपोषण सुरूच

March 18, 2011 12:47 PM0 commentsViews: 5

18 मार्च

आदिवासी आश्रमशाळांच्या शंभर शिक्षकांनी गेल्या 20 दिवसापासून नाशिकमध्ये आदिवासी विकास आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गैरकारभाराच्या कारणावरून आदिवासी विकास खात्याने अनुदानित खाजगी आश्रमशाळा बंद केल्या. त्यामुळे या शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.

सर्व शिक्षकांना शासकीय आश्रमशाळांच्या सेवेत सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सामूहिक मुंडण केलं तरी त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाही. आज त्यांच्या उपोषणाला 20 दिवस उलटून गेले आहेत. त्यांच्यातील काही शिक्षकांची आता प्रकृती खालावली असून त्यांच्यावर नाशिकच्या सीव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close