सांगलीमध्ये शेतकर्‍यांनी सहकार खात्याचं ऑफिस पेटवलं

November 7, 2008 4:52 PM0 commentsViews: 3

7 नोव्हेंबर, सांगलीसांगलीमध्ये ऊसाच्या दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं सहकार खात्याच्या अधिकार्‍याचं ऑफिस पेटवून दिलं आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांची लूट करतंय, असा त्यांचा आरोप आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव दिला नाही तर सर्वच सरकारी ऑफीसेस पेटवून देण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले की शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरुन निघत नाही .त्यामुळे शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे.आमची मागणी बरोबर आहे, त्यात तडजोड होणार नाही.

close