आयर्लंडचा हॉलंड दमदार विजय

March 18, 2011 1:06 PM0 commentsViews: 2

18 मार्च

वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी आयर्लंड आणि हॉलंड या टीममध्ये झालेली मॅच आयर्लंडने जिंकली आहे. हॉलंडने समोर ठेवलेलं 307 रनचं आव्हान त्यांनी चार विकेट गमावून पूर्ण केलं. या मॅचवर बॅट्समननी वर्चस्व गाजवले. आणि सकाळी ड्यूसकाटेने सेंच्युरी केली होती. आता संध्याकाळच्या सेशनमध्ये पीटर स्टर्लिंगची सेंच्युरी फॅन्सना पाहायला मिळाली. स्टर्लिंगने कॅप्टन पोर्टरफिल्डच्या सहाय्याने 177 रनची ओपनिंग आयर्लंडला करुन दिली. आणि तिथेच त्यांचा विजय नक्की झाला. नील ओब्रायन 57 रनवर नॉटआऊट राहिला. आयर्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपलं असलं तरी लीगमध्ये त्यांनी दोन विजय मिळवले. तर हॉलंड टीमची पाटी मात्र कोरी राहिली.

close