सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली पाणी खात्याच्या कार्यालयाची तोडफोड

March 18, 2011 2:45 PM0 commentsViews:

18 मार्च

पाणीप्रश्नावरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी डोंबिवलीतील एमआयडीसी पाणी खात्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पाण्यावाचून नागरिक त्रस्त आहेत. यासाठी महापौर वैजयंती घोलप आणि सर्वपक्षीय नगरसेवक, एमआयडीसी पाणी खात्याचे अधिकारी विजय पणीकर यांची भेट घेण्यास गेले होते. पाण्याची अवाजवी बीलं कमी करावी, केडीएमसीला 10 एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे अशी सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी होती. ही मागणी अधिकार्‍यांनी फेटाळून लावली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी खात्याच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात महापौर वैजयंती घोलप यांच्या हाताला दुखापत झाली.

close