नगरसेवकाने फेकला महापौरांवर माईक

March 18, 2011 3:17 PM0 commentsViews: 7

18 मार्च

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत आज प्रचंड गोधळ उडाला. शहर स्वच्छता आराखडा बैठकीत वाद झाला आणि बैठकीचं रूपांतर आखाड्यात झालं. आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात पेपर भिरकावले. तर काँग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत आणि शिवसेनेचे मनोज हळदणकर यांनी महापौर सागर नाईक यांच्यावर चक्क माईक भिरकावला त्यातून महापौर थोडक्यात बचावले. त्यानंतर सागर नाईक यांनी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

close