करुणानिधींच्या पत्नी आणि मुलीवर सीबीआय एफआयआर दाखल करणार

March 18, 2011 5:13 PM0 commentsViews: 3

18 मार्च

2 जी घोटाळ्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना सीबीआयने धक्का दिला. त्यांची मुलगी कनिमोळी आणि पत्नी दयालू अम्मा यांचं नाव सीबीआय आपल्या एफआयआरमध्ये दाखल करणार आहे. कनिमोळी आणि दयालू अम्मा या दोघींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. डीबी रिऍल्टी ग्रुपकडून या दोघींनी 200 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या दोघींही करुणानिधी कुटुंबाच्या कलाईनार टीव्हीत शेअरहोल्डर्स आहेत.

close