पुण्यात रामोशी वतन प्रकरणी भाजपाचे धरणं आंदोलन

March 18, 2011 4:40 PM0 commentsViews: 31

18 मार्च

पुण्यातील 102 एकर रामोशी वतन जमीन गैरव्यावहार प्रकरणी दोषी आरोंपीवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच सर्व जमिनीचा सात बारा कोरा करून जमिनीचा ताबा त्या भागात राहत असलेल्या हजारो कुटुंबांना द्यावा या मागणीकरता भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं.

तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या जमिनीच्या फेरफाराचे आदेश दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांच्या तक्रारीवरून पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या 24 एकर जमिनीची खाजगी मालमत्ता म्हणून झालेली नोंद रद्द करावी असं पत्र पुणे महापालिकेनं महसूल विभागाला दिलं होतं.

close