पंतप्रधानांविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याचा भाजपचा निर्णय

March 18, 2011 5:30 PM0 commentsViews: 2

18 मार्च

पंतप्रधानांच्या निवेदनानंतर सरकार आणि विरोधक यांच्यातला संघर्ष वाढला आहे. पंतप्रधानांविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पण विकिलिक्सचा वापर आपल्याविरोधात हत्यार म्हणून करण्याचे विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

पंतप्रधानांनी लोकसभेत निवेदन दिल्यानंतर लगेचच स्पष्ट झालं की, विकिलिक्सवरून सुरू झालेला गदारोळ इतक्यातच संपणार नाही. गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं. आणि भाजपने विकिलिक्स आणि कॅश फॉर वोटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. तसेच पंतप्रधानांविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला.

दुसरीकडे, सभागृहाच्या अध्यक्षांना जुमानत नसल्याबद्दल काँग्रेसनंही सुषमा स्वराज यांच्याविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतल्यानं संसदेतीलं महानाट्य कायम राहणार आहे.

काही राज्यांतल्या येत्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची तसेच विरोधकांना निष्प्रभ करण्याची आशा काँग्रेसला असल्याचे पंतप्रधानांच्या निवेदनातून दिसून आलं. तर मनमोहन सिंग अमेरिकेच्या खूप जवळचे असल्याचा मुद्दा प्रचारात वापरण्याचे डाव्यांचे धोरण आहे.

close