पुण्यात रोहनच्या मारेकर्‍यांना अटक

March 18, 2011 4:43 PM0 commentsViews: 1

18 मार्च

पुण्यात मागिल महिन्यात 5 तारखेला अपहरण करून खून झालेल्या रोहन सुदाकर कदम याच्या मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. रोहनचा मृतदेह औंध भागात सापडला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून प्रमोद तेजराज पिल्ले, लॉरेन्स ऊर्फ मोग्या मोजेस जोसेफ, रोहीत बाळकृष्ण कापसे तसेच नवनाथ ऊर्फ सोन्या दत्तात्रय जाधव या चौघांना अटक करण्यात आली. तपासात उघड झालेल्या माहितीत प्रमोद पिल्लेच्या कँप भागातील परमीट रूममधे रोहन कदम हा त्याच्या मित्रांसह जाऊन त्रास द्यायचा आणि 2 लाखाची खंडणीही मागितली होती. या त्रासाला कंटाळून प्रमोदनं त्याच्या मित्रांसह रोहनच्या खूनाचा कट रचला. सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close