जपानमध्ये किरणोत्सर्गाचा धोका वाढला

March 18, 2011 5:03 PM0 commentsViews: 1

18 मार्च

जपानमधील फुकुशिमा दायची रिऍक्टरमधील किरणोत्सर्गाचा धोका 4 स्केलवरून 5 स्केलपर्यंत वाढला आहे. या धोक्याची आंतरराष्ट्रीय कमाल पातळी 7 स्केल इतकी आहे. अणुऊर्जा प्रकल्पातील अणुसंकट टाळण्यासाठी कर्मचारी रात्रदिवस प्रयत्न करत आहे. रिऍक्टर्सचं बांधकाम, मेटल वर्क, पाईपलाईन या सर्वांचं मोठ नुकसान झालंय. येथील कर्मचार्‍यांसमोरचं मोठं आव्हान आहे पाणी आणि वीजेचा पुरवठा सुरू करणे. पण हा खंडीत झालेला पुरवठा पूर्ववत करणं सोपं नाही कारण त्यासाठीची यंत्रणाच कोलमडली आहे.

close