अच्युतानंदन यांना पुन्हा मिळणार तिकीट

March 18, 2011 5:30 PM0 commentsViews: 2

18 मार्च

केरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचा आता विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यकर्त्यांच्या दबावानंतर सीपीएमला आपला निर्णय बदलावा लागला. अच्युतानंदन आता मालमपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय गेल्या बुधवारी सीपीएमच्या पॉलिटब्युरोनं घेतला होता. पण या निर्णयाविरोधात पक्षाच्या कॅडरनी राज्यभरात निदर्शनं केली. त्यामुळे पक्षाने माघार घेतली. 2006 च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांना पहिल्यांदा तिकीट नाकारलं होतं. पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे नंतर त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली.

close