आरटीओ कार्यालयात शिवसेनाच्या नगरसेवकाचा राडा

March 19, 2011 9:27 AM0 commentsViews: 1

19 मार्च

औरंगाबादच्या आरटीओ ऑफिसमध्ये शिवसेना नगरसेवकाची कार्यकर्त्यांसह तोडफोड केली आहे. गाडीला व्हीआयपी नंबर हवा यासाठी शिवसेनेचा नगरसेवक किशोर कच्छवाह आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये अधिकार्‍यांशी आधी वाद घातला. मात्र नंतर या टोळक्याने सरळ तोडफोडच केली. आरटीओ ऑफिसमधील काचा त्यांनी फोडल्या. आणि आता तोडफोड करून नगरसेवकांसह हे टोळकं फरार झाले आहे.

close