रंगाचे फुगे फेकाल तर जन्मठेप भोगावी लागणार

March 19, 2011 9:52 AM0 commentsViews: 10

19 मार्च

देशभरात आज होळी उत्साहात साजरी होतेय. मुंबईमध्येही हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत विशेषतः लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मात्र होळी साजरी करणार्‍यांच्या अतिउत्साहाचा फटका सहन करावा लागतो. रंगाचे फुगे मारण्याच्या प्रकारामुळे अनेक नागरिक त्रासून जातात. यंदा यावर्षी अशा अतिउत्साही मंडळींवर रेल्वे पोलिसांनी करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी रंगपंचमीला लोकलवर फुगे फेकण्याचे प्रकार घडतात. पण यंदा असे फुगे फेकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आणि फुगे फेकण्यानं जर कोणाला इजा झाली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठीही रेल्वे पोलीस कसून प्रयत्न करणार आहेत.

close