गतीमंद मुलांनी लुटला रंगोत्सवाचा आनंद

March 19, 2011 10:37 AM0 commentsViews: 3

19 मार्च

ठाण्यातल्या वसंत विहारमधील जिद्द शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मराठी कलाकारांसोबत रंग उधळत होळी आणि रंगोत्सवाचा आनंद लुटला गतीमंद मुलांच्या या शाळेत गेल्या 6 वर्षांपासून होळी खेळली जातेय. नैसर्गिक रंगाचा वापर करत मुलांनी पर्यावरण जपण्याचाही संदेश दिला. यावेळी विजू माने आणि अभिजित खांडगेकर यांनी मुलांसोबत रंग खेळत त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही मारल्या. अशा प्रकाराची होळी आपण पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया या कलाकारांनी व्यक्त केली.

close