भुजबळ ओबामांना ‘ गुलामगिरी ‘ पुस्तक पाठवणार

November 7, 2008 4:54 PM0 commentsViews: 67

7 नोव्हेंबर, मुंबई135 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी त्यांचं गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांना अपर्ण केलं होतं. आफ्रिकन अमेरिकन असलेल्या ओबामा यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालीय. समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ आता हेच पुस्तक बराक ओबामा यांना भेट देणार आहेत.समाजातल्या शोषितांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशवासीय अमेरिकेतल्या पुरोगामी लोकांकडून प्रेरणा घेतील, असा आशावाद महात्मा फुले यांनी आपल्या ' गुलामगिरी ' या पुस्तकात व्यक्त केला होता. त्यामुळं महात्मा फुले आपलं हे पुस्तक अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांना अर्पण केलं होतं. हाच आठवणीचा धागा पकडून, छगन भुजबळ ' गुलामगिरी ' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद असलेलं पुस्तक अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांना भेट देणार आहेत.

close