बांगलादेशचा ‘गेम ओव्हर’

March 19, 2011 11:39 AM0 commentsViews:

19 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशचं आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 206 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिका ग्रुप बीमध्ये अव्वल क्रमांकावर पोहचली. तर बांगलादेशचा गेम ओव्हर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 285 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची टीम अवघ्या 78 रन्समध्ये ऑलआऊट झाली. बांगलादेशतर्फे शाकिब अल हसननं सर्वाधिक 30 रन्स केले. पण इतर बॅट्समनना रन्सचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे रॉबिन पीटरनसनने 4 तर सोसोबेनं 3 विकेट घेतल्या.

close