सेहवागच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

March 19, 2011 11:51 AM0 commentsViews: 62

19 मार्च

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान उद्या महत्वाची आणि निर्णायक लढत रंगणार आहे. पण या मॅचपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवाग या मॅचमध्ये खेळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वीरेंद्र सेहवागला गुडघ्याच्या दुखापतीनं सतावलंय. यामुळे त्यानं दोन दिवस टीमबरोबर सराव केलेला नाही. रविवारीच्या मॅचपूर्वी तो फिट होईल असा अंदाज आहे. त्यामुळे वेस्टइंडिज विरूद्धच्या मॅचमध्ये सेहवाग खेळणार की नाही याचा निर्णय उद्या मॅचआधीच घेण्यात येईल असं भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानं म्हटलं आहे.

close