नाशिकमध्ये बबनराव पाचपुते यांच्या प्रतिमेची होळी

March 19, 2011 11:57 AM0 commentsViews: 120

19 मार्च

नाशिकमध्ये आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रतिमेची होळी केली. व्हिडिओ एडिटींग या कोर्सच्या योजनेत लाखो रुपयांचे गैरव्यवहार झाला असल्याने विरोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आज आदिवासी विकास आयुक्तालयाच्या पुढे हे आंदोलन करण्यात आले. यावर्षी पुण्यातील एका मान्यता प्राप्त संस्थेला या प्रशिक्षणाचं काम आदिवासी विकास खात्यातर्फे देण्यात आलं होतं. मात्र यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यात. याबाबत अनेकदा निवेदनं देऊन त्याची दखल घेतली जात नाही.

close