आ.जाधव यांची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

March 19, 2011 2:55 PM0 commentsViews: 2

19 मार्च

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणात नव्याने एफ.आय.आर. दाखल करण्याची परवानगी मिळुनही औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी जाधव यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांनी निलंबित करण्यात आलं आहे. आज शनिवारी जाधव नव्यानं तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलीस स्टेशनमध्ये कोणताही वरिष्ठ अधिकारी नव्हता असंही जाधव यांनी सांगितलं.

close