‘ देशद्राही ‘ चं रिलीज पुढे ढकललं

November 7, 2008 4:57 PM0 commentsViews: 4

7 नोव्हेंबर, मुंबईकमाल रशिद खान यांचा ' देशद्रोही ' सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार होता. पण मराठी-अमराठी वादावरचा हा सिनेमा मुंबई पोलिसांनी पाहिल्याशिवाय रिलीज होणार नाही. त्यामुळे तो रिलीज झाला नाही. टीव्हीवर मात्र ' देशद्रोही ' या सिनेमाचे प्रोमोज वरचेवर पहायला मिळत आहेत. सिनेमाचा निर्माता, लेखक आणि अभिनेता कमाल रशिद खान आहे. ज्यानं प्रोमोमध्ये स्वतःचा उल्लेख केआरके म्हणून केलाय. हा सिनेमा मराठी अमराठीच्या मुद्यावर आधारला असल्याचा कमाल यांचा दावा आहे. या प्रोमोजमुळं मनसे आणि शिवसेनेनंही रिलीज आधी सिनेमा पाहण्याचा आग्रह धरला आहे.

close