प्रतिकला मदतीचं ‘ग्रीन कार्ड’

March 19, 2011 3:03 PM0 commentsViews: 4

19 मार्च

चेंबुरच्या झोपडपट्टीत राहणारा फुटबॉल स्टार प्रतिक शिंदेचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. अमेरिकेत जाऊन फुटबॉल मधील हायटेक ट्रेनिंग घेण्याचा त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. स्पॉन्सर्सशिप नसल्याने त्याचा हा दौरा धोक्यात आला होता. आयबीएन लोकमतनं त्याची ही व्यथा मांडल्यानंतर स्पॉन्सर्सशिपचा त्याच्यावर वर्षाव झाला.

प्रतिक शिंदे म्हणतो की, माझ्या अमेरिकेतील फुटबॉल प्रशिक्षणासाठी स्पॉन्सर्सशिप मिळाल्याची बातमी मला फोनवरून कळली आणि मला पहिल्यांदा विश्वासचं बसला नाही. प्रतिक शिंदेची ही प्रतिक्रियाच खुप बोलकी होती. आईनं धुणी भांडीकरून प्रतिकला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. पण पैशाअभावी प्रतिकची अमेरिकेतील प्रशिक्षणाची संधी हुकणार अशी बातमी आयबीएन लोकमतनं दिली आणि प्रतिकवर चौहुबाजेनं स्पॉन्सरशिपचा वर्षाव झाला. सगळ्यात आधी मदतीचा हात पुढे केला तो बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेनं.

बुलढाणा को ऑपरेटिव्ह बँकेच्या पुढाकारामुळे आता प्रतिकचं स्वप्न साकार होणार आहे. अमेरिकेतील पायरेट क्लब पुढील एक वर्ष त्याला अमेरिकेत हायटेक प्रशिक्षण देणार आहे. मिशन फुटबॉलसाठी प्रतिकला आयबीएन लोकमतच्याही हार्दीक शुभेच्छा.

close