फुकुशिमा थंड ; पुन्हा भूकंपाचा धक्का

March 19, 2011 4:57 PM0 commentsViews: 1

19 मार्च

सुनामीच्या तडाख्यामुळे धोकादायक बनलेल्या फुकुशिमातील सहा रिऍक्टर्सपैकी तीन रिऍक्टर्स नियंत्रणात आणण्यात इंजिनिअर्सना यश आलंय. 3 नंबरच्या रिऍक्टरवर फायर ब्रिगेडनं सलग तीन तास पाण्याचा मारा केला. आणि त्यानंतर हे दुर्मिळ यश मिळाल्याचं इंजिनिअर्सनी सांगितलंय.

या रिऍक्टरमध्ये सतत स्फोट होत असल्याने तो अतिशय धोकादायक बनला होता. दरम्यान फुकुशिमा अणुभट्टी जवळच्या भागात किरणोत्सर्गाचे परिणाम आता दिसायला लागला आहे. या परिसरात दूध आणि भाजीपाल्यांमध्ये किरणोत्सर्गी पदार्थांचे अंश आढळून आलेत. राजधानी टोकियात घेतलेल्या पाण्यांच्या नमुन्यातही रेडिऍक्टीव्ह आयोडीन आढळून आलंय. पण याचा मानवाच्या आरोग्याला धोका नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला.

दरम्यान, सुनामीनंतरच्या संकटाशी झुंजत असलेल्या जपानला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी नोंदली गेली. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाच्या दक्षिण भागात हा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे समुद्राच्या पातळीत बदल होऊ शकतो, पण सुनामीचा मात्र कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.

close