चंद्र पृथ्वीजवळ ; नैसर्गिक आपत्तीचा धोका ?

March 19, 2011 3:18 PM0 commentsViews: 56

19 मार्च

खगोलप्रेमींना आज एक दुर्मिळ संधी अनुभवता येणार आहे. आज मध्यरात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. आजची घटना ही तब्बल 18 ते 19 वर्षांनंतर घडणारी आहे. या प्रक्रियेत चंद्रबिंब तब्बल 15 टक्के मोठं दिसणार आहे. तसेच चंद्राची चमक 30 टक्के अधिक असेल. चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर आज 3 लाख 56 हजार 600 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. चंद्राच्या परिक्रमेच्या मार्गावर हे अंतर अवलंबून आहे. ही दुर्मिळ पर्वणी पाहण्यासाठी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं मत खगोल तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

सुपर मून म्हणजे काय ?

- एका पूर्ण चंद्राकृती दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात- सुपर मून हे नाव ज्योतिषी रिचर्ड नूले यांनी दिलंय- चंद्र हा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो- चंद्र पृथ्वीभोवती कोणत्या प्रकारच्या कक्षेत फिरतो यावर चंद्राचं पृथ्वीपासून अंतर अवलंबून असतं- चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या सर्वात कमी अंतराला ' पेरिजी ' तर सर्वात जास्त अंतराला 'अपोजी ' म्हणतात.सर्वाधिक सुपरमून कधी असतो ?

- चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो- गेल्या 18 वर्षांनी हा योग आला आहे- सुपरमून आणि पूर्ण चंद्र हा योग नेहमी नसतो- आज सुपरमून आणि पूर्ण चंद्र हे दोन्ही दिसणार आहे

पण त्याचबरोबर हेही सत्य आहे की सुपर मून आणि पूर्ण चंद्र असा योग नेहमीच नसतो. मात्र आज हा योग दिसणार आहे. म्हणजे आज पूर्ण चंद्र आणि सुपर मून दोन्ही असणार आहे.

ज्योतिष वाणी

रिचर्ड नुले हे एक ज्योतिषी आहेत. त्यांच्या मते, चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या कक्षेत येणं ही धोक्याची पूर्वसुचना आहे. मात्र ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांताशी शास्त्रज्ञ सहमत नाहीत. पृथ्वीची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. आजच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून फक्त 3 लाख 56 हजार 577 किलोमीटर अंतरावर असणार आहे. रिचर्ड यांच्या म्हणण्यानुसार यामुळे नैसर्गिक संकटाचा धोका संभवतो. 1900 मध्ये टेक्सासमध्ये झालेलं वादळ, 1948 मध्ये झालेला मध्य आशियातला भूकंप, 1974 मध्ये ऑस्ट्रेलियामधील सायक्लोथोन, 1991 मध्ये फिलीपाईन्समध्ये झालेला ज्वालामुखी अशा अनेक नैसर्गिक घटना घडल्यात ते चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या कक्षेत आल्यामुळेच. मात्र शास्त्रज्ञांना ही गोष्ट मान्य नाही.

शास्त्रज्ञ मिला मित्रा म्हणता की, 2005 मध्ये सूपरमून स्थिती होण्याच्या दहा दिवस आधी कत्ररिना वादळ आलं होतं. 1974 मध्येही सायक्लोननं बरचं नुकसान झालं होतं. मात्र सुपर मून स्थिती होण्याच्या एक महिना आधी ही नैसर्गिक आपत्ती उद्भवली होती. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. चंद्र हा पृथ्वीच्या नेहमीच जवळ असतो. पण आज तो पृथ्वीच्या 3 लाख 56 हजार 577 किलोमीटरपर्यंत येईल.

तर जपानमध्ये आलेली त्सुनामीसुद्धा चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळेच घडल्याचं ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणत आहेत. शास्त्रज्ञांनी मात्र ही बाब खोडून काढली. चंद्र आणि पृथ्वीच्या मिलनाच्या या खगोलीय घटनेमुळे शास्त्रज्ञ आणि ज्योतिषांना भांडणासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. मुद्दा काहीही असो, तुम्ही टेलिस्कोपच्या मदतीनं ह्या सुंदर घटनेचा अनुभव घ्या.

close