सुनील जोशी हत्या प्रकरण एनआयएकडे सोपवणार

March 19, 2011 5:04 PM0 commentsViews: 2

19 मार्च

देशातील हिंदू दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकरणं एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सीकडे सोपवण्यात येणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिलीय. यात संघाचे नेते सुनील जोशी यांच्या हत्या प्रकरणाचाही समावेश असेल. पुढच्या आठवड्यात बुधवारपर्यंत याबाबतचे आदेश दिले जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली. हिंदू दहशतवादाशी संबंधित सात प्रकरणं आहेत. त्यापैकी काही सीबीआय तर काही राज्यांच्या पोलिसांकडे आहेत. सीबीआयनं ही प्रकरणं एनआयएकडे सोपवायला अंशतः तयारी दाखवल्याचे समजतंय. पण मध्य प्रदेश सरकारनं मात्र सुनील जोशी हत्या प्रकरणाच्या तपासात आपला सहभाग असावा अशी इच्छा व्यक्त केली.

close