विकिलिक्समुळे भाजप ही अडचणीत

March 19, 2011 5:16 PM0 commentsViews:

19 मार्च

विकिलिक्सच्या बॉम्बगोळ्यानं आता भारत-अमेरिका अणुकरारावरून भाजपलाही अडचणीत आणलंय. 2008 मध्ये तेव्हाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अणुकराराला असणार्‍या पक्षाच्या विरोधाची धार कमी केली, असं विकिलिक्सनं म्हटलंय. तसेच भाजप सत्तेवर आल्यास करारात फेरफार करण्याचे पाऊल लगेच उचलणार नाही असं आश्वासन अडवाणी यांनी अमेरिकेला दिलं होतं. तसेच भाजपच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज नसल्याचंही भाजपने अमेरिकी अधिकार्‍यांना सांगितलं होतं असा विकिलिक्सचा दावा आहे.

close