पाकिस्तानने रोखला कांगारूचा विजय रथ

March 19, 2011 5:44 PM0 commentsViews: 2

19 मार्च

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ अखेर पाकिस्ताननं रोखला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेटनं पराभव करत ग्रुप एमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी पाकिस्तानसमोर 177 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने 4 विकेट आणि 9 ओव्हर राखत पार केलं. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. ओपनिंगला आलेले मोहम्मद हाफीज आणि कामरान अकमल झटपट आऊट झाले. पण यानंतर असद शफिक आणि युनिस खाननं पाकची इनिंग सावरली. या जोडीनं 53 रन्सची पार्टनरशिप केली. युनिस खान 31 तर शफिक 46 रन्सवर आऊट झाला. पण उमर अकमल आणि ऑलराऊंडर अब्दुल रझ्झाकनं झुंजार बॅटिंग करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपमधली सलग 34 विजय मिळण्याची मालिका खंडित झाली.

close