लिबियावर फ्रेंच दलाचा हल्ला

March 19, 2011 5:49 PM0 commentsViews: 4

19 मार्च

लिबियातील निरपराध नागरिकांना गद्दाफी यांच्यापासून वाचवण्यासाठी लष्करी कारवाईला सुरुवात झाल्याचं फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांनी जाहीर केलं आहे. युरोपीयन राष्ट्र, अमेरिका आणि अरब देश या हल्यातं सहभागी झाल्याची माहिती सारकोझी यानी दिली.

दरम्यान लिबियातल्या बेंगझाई या बंडखोरांचा बालेकिल्ला असणार्‍या भागात तुंबळ लढाई सुरू आहे. गद्दाफी यांनी या भागात आपले सैन्य घुसवले आहेत. एका लढाऊ विमानावर गोळी घालून पाडण्यात आले आहे. हे विमान कुणाच्या मालकीचं होतं ते मात्र समजू शकलेलं नाही. मात्र लिबियाच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप केल्यास पश्चाताप करावा लागेल अशी धमकी गद्दाफी यांनी जागतिक नेत्यांना दिली.

close