भारताची पहिली बॅटिंग

March 20, 2011 8:43 AM0 commentsViews: 3

20 मार्च

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची मॅच लीगमधील शेवटची मॅच आज होत आहे. ग्रुप बीमध्ये दुसर्‍या स्थानासाठी रंगणार्‍या या मॅचसाठी दोन्ही टीमचे खेळाडू सज्ज झाले आहेत. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेतल्या लीग मॅचमधला आजचा शेवटचा दिवस आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान लीगमधली शेवटची मॅच खेळवली जातेय आणि याच मॅचवर ग्रुप बी मधलं फायनल स्टँडिंग ठरेल. ही मॅच जिंकणारी टीम पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर ही डे नाईट मॅच रंगणार आहे. त्यामुळे स्पिन बॉलिंगला महत्त्व येईल. त्यासाठीच भारतीय टीममध्ये या मॅचसाठी आर अश्विनला संधी मिळालीय. शिवाय सुरेश रैनाचाही समावेश करण्यात आला आहे. वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीमुळे तो या मॅचमध्ये खेळू शकला नाही. तर वेस्ट इंडिजच्या टीमने दुबळ्या टीमविरुद्ध तीन मॅच तर जिंकल्या. पण दक्षिणआफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध त्यांचा पराभव झाला आहे. त्यांची बॅटिंग सातत्यपूर्ण होत नाही. आणि याची चिंता विंडिज टीमला असेल.

close