रायगडात पारंपारिक होळी साजरी

March 20, 2011 10:06 AM0 commentsViews: 4

20 मार्च

रायगड जिल्ह्यातील फौजी आंबवडे येथे पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली गेली. बारा कोंडांची 12 लाकडं रात्रभर सजवून संपूर्ण गावकरी होम रचतात. त्यानंतर पहाटे या होमाला अग्नी दिला जातो. इतिहासाचा वारसा असलेल्या या परंपरेला गावकर्‍यांनी आजही जोपासला आहे. होळीच्या आवाजावर गावकरी एकवटतात. त्यानंतर पेटलेल्या होमाभोवती लहानमोठे सगळेच काठ्यांनी खेळतात. याला काट्या खेळणे म्हणतात. वर्षातून एकदा येणार्‍या या सणासाठी मुंबई-पुण्यातून चाकरमानी आणि लष्करातील फौजीदेखील हजेरी लावतात. गावाचा एकत्रित सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो लोक येतात.

close