युवराजची शानदार सेंचुरी

March 20, 2011 11:57 AM0 commentsViews: 1

20 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या शेवटच्या लढतीत भारत आणि वेस्ट इंडिज संघ यांचा चांगलाचा सामना रंगला आहे. युवराज सिंगने संयमाने फलंदाजी करत वर्ल्ड कपमध्ये पहिले शतक पूर्ण केले आहे. त्यांने 112 चेंडूचा सामाना करत 100 धावा पूर्ण केल्या यात 10 चौकार आणि 1 षटकाराचा ही समावेश आहे.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरूवात निराशजनक झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2 रन्स काढून आऊट झाला. त्या पाठोपाठ गौतम गंभीर ही 22 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने भारताची स्थिती सुधारली दोघांनी ही 100 धावांची पार्टनरशीप पूर्ण करत भारताला 150 धावांचा टप्पा पूर्ण करून दिली. विराट कोहलीने शानदार 59 धावांची खेळी केली. कोहलीच्यानंतर आलेला भारतीय टीमचा कर्णधार 22 धावांवर आऊट झाला आहे. भारताने 41 व्या ओव्हरमध्ये 216 रन्स आणि 4 विकेटच्या गमवून टप्पा पार केला आहे.

close