गोव्यात पर्यटकांनी मनसोक्त रंग उधळला

March 20, 2011 3:06 PM0 commentsViews: 4

20 मार्च

गोवा होळी गोव्यातही रंगोत्सव हा उत्साहात साजरा झाला. गोव्यात याला शिमगो असं म्हणतात. पणजीत शिमगोत्सव समितीनं खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. पणजीत आलेल्या विदेशी पर्यटकांनीही या शिमगोत्सवात मनसोक्त रंग उधळला. पणजीत खास मिरवणूकही काढण्यात आली होती. रंगाची उधळण करत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या रंगोत्सवात सहभागी झाले होते.

close