कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर गर्भपात

March 21, 2011 9:26 AM0 commentsViews: 1

21 मार्च

स्त्रीभ्रूणहत्या थांबावी म्हणून सारखी ओरड केली जाते. प्रत्यक्षात मात्र याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. याचं एक उदाहरण कोल्हापूरमध्ये समोर आलंय. रविवारी कोल्हापुरातल्या टेंबलाईवाडी इथल्या डॉ. संगीता परमाळे यांच्या इंदिरा क्लिनिकमध्ये एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला.

महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.शकुंतला मेंगाणे यांनी या क्लिनिकवर कारवाई केली. कोल्हापूरमध्ये आधार या स्वयंसेवी संस्थेला इंदिरा क्लिनिकमध्ये एका महिलेला गर्भपात करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली. या महिलेची त्याआधी इथंच डॉ. बशीर महाबीर यांनी गर्भलिंग तपासणी करण्यात आल्याची माहितीही त्यांच्याकडे होती. आरोग्य अधिकार्‍यांच्या मदतीने या क्लिनिकवर धाड टाकण्यात आली. गर्भपात केलेला गर्भ 16 आठवड्यांच्या मुलीचा असल्याचे स्पष्ट झालं. या प्रकरणी आरोग्य अधिकार्‍यांनी डॉ.संगीता परमाळे आणि डॉ.शकील महाबरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी राजारामपुरी पोलिसांना कळवलं. पण हे प्रकरण आपल्या हद्दीत येत नसल्याचे पोलिसांनी म्हणणं आहे. मात्र या प्रकरणानंतर जिल्ह्याचे सर्जन डॉ. रविंद्र निटुरकर यांनी घेतलेल्या बैठकीत बेकादेशीर गर्भपात करणार्‍या डॉ. संगीता परमाळे यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवण्यास सांगितलं आहे. मात्र महिलेची गर्भलिंग तपासणी करणार्‍या डॉक्टरवर मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

close