मोनिका हत्याप्रकरणी नागपूरकरांना आवाहन

March 21, 2011 9:35 AM0 commentsViews: 4

21 मार्च

नागपूरमध्ये दोन आठवड्यांपूर्वी भरदिवसा मोनिका किरणापुरेचा भर रस्त्यावर खून झाला.ही घटना घडली त्यावेळी अनेक जणांनी खून होताना पाहिले होते. पण आज तब्बल 10 दिवस उलटून ही त्याविषयी माहिती द्यायला मात्र कोणीही तयार नाही. त्यामुळेच दोन आठवडे उलटून गेले तरीही मोनिकाचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलिसांना काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे आता मोनिकाचे आई वडीलच नागपूरकरांना पुढं येण्याचं आवाहन करत आहे. नागपूरकरांच्या मनात नेमकी कशाची दहशत आहे, ते यासंदर्भात काहीही बोलायला का तयार नाहीत असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या प्रकरणामध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर एस. बुराडे यांची बदली करण्यात आली आहे. पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत.

close