देहूमध्ये रंगतोय तुकाराम बिजेचा सोहळा

March 21, 2011 9:42 AM0 commentsViews: 1

21 मार्च

संत तुकाराम बिजेसाठी आज देहूमध्ये राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. तुकारामांच्या वैकुंठगमनाला आज 362 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा सोहळा केला जातो. या निमित्तानं वैकुंठगमन मंदिराला रोषणाई करण्यात आली. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनबारीतून भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पालखीसाठी स्वतंत्र मार्ग नेमण्यात आला आहे. तर इंद्रायणी नदीत जास्त पाणीही सोडण्यात आलंय.

close