फुकुशिमा प्रकल्पाला वीज पुरवठा

March 20, 2011 6:14 PM0 commentsViews: 3

20 मार्च

फुकुशिमा अणूप्रकल्पासंदर्भातील अणुउत्सर्जनाच्या धोक्यावर मात करण्याच्या जपानच्या सुरु असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना आज काहीसं यश आलंय. जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा केंद्रातल्या रिऍक्टरला थंड करणार्‍या यंत्रणेला लागणारा वीज पुरवठा काही प्रमाणात सुरू करण्यास तज्ञांना यश आलंय. त्यामुळे अणुभट्टीचं तापमान नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. काही अणुभट्टीमधील इंधन रॉड आता थंड होत असल्याने परिस्थीती नियंत्रणात येत असल्याची माहिती क्योडो न्यूजनं दिली आहे. दरम्यान फुकुशिमा अणुऊर्जा केंद्राजवळच्या परिसरात रेडीएशनचा धोका अद्याप टळलेला नाही, दुध आणि काही भाज्यांमध्ये रेडीएशनचं प्रमाण आढळलेलं असल्याची माहिती जपानचे कॅबिनेट सचिवांनी सांगितले आहे.

जपानमधील भूकंप आणि सुनामीतील मृतांचा आकडा आता वीस हजारांच्यावर गेल्याची शक्यता आहे. तेथील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत8 हजार 133 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हजार 272 लोक अजूनही बेपत्ता आहेत. एकट्या मियागी शहरातच 15 हजार मृतदेह असण्याची शक्यतापोलिसांनी व्यक्त केली. तेथील काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मियागी शहरात ढिगार्‍याखालून तब्बल 9 दिवसांनी दोन व्यक्तींना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय.

close