पुरोहितने केला लष्कराच्या गुप्त माहितीचा गैरवापर

November 7, 2008 5:33 PM0 commentsViews: 1

07 नोव्हेंबर,मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटकेत असलेला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हा पश्चिम विभागाच्या इंटेलिजन्स विभागाचा प्रमुख होता. लष्कराच्या गुप्त माहितीचा गैरवापर करून त्यानं साथीदारांसह बॉम्बस्फोटाचा कट रचला. मिलिटरीच्या माध्यमातून गुप्त माहिती गोळा करायची आणि त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी करायचा. मिलिटरीच्या अधिका-यांनी केलेल्या चौकशीत हे सगळं आता समोर येतंय. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हुशार आहे. तपास अधिका-यांना कसं असहकार्य करायचं हे त्याला चांगलं माहित आहे.असं असलं तरी संपूर्ण चौकशीनंतर सर्व माहिती नक्की मिळेल याची एटीएसच्या अधिका-यांना खात्री आहे.पुरोहितच्या मदतीशिवाय साध्वी आणि तिचे साथीदार बॉम्बस्फोट करूच शकले नसते. त्यामुळे पुरोहित यांच्या संपर्कात कोणकोण होतं. बॉम्बस्फोटाचा कट कुठे शिजला, हत्यारं कुणी पुरवली, पैशाची व्यवस्था काय होती.आरडीएक्स केव्हा देण्यात आलं.बॉम्ब कुणी आणि केव्हा बनवला.या सर्व बाबींचा कसून तपास एटीएसही करतंय.

close