महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण चाचण्यानंतरच – मुख्यमंत्री

March 21, 2011 10:00 AM0 commentsViews: 6

21 मार्च

जैतापूरला भूकंपाचा धोका नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. फुकुशिमा भूकंपप्रवण क्षेत्राच्या 5 व्या झोनमध्ये तर भारत 3 झोन मध्ये आहे अशीही माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यापुढे महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प येणार असेल तर सुरक्षेच्या पुर्ण चाचण्यानंतरच परवानगी देणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

close