विकिलिक्स :अमेरिका प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहत होते

March 21, 2011 10:16 AM0 commentsViews: 2

21 मार्च

विकिलिक्सचे धक्के एकापाठोपाठ सुरूच आहेत. त्यातच आता प्रणव मुखर्जी यांच्याकडे अमेरिका पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहत होते, असं विकिलिक्सच्या नव्या केबलमध्ये म्हंटलंय. मुखर्जी यांना त्यादृष्टीने तयार करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

जून 2005 च्या केबलमध्ये काँग्रेसचे ट्रबलशूटर अर्थात संकटमोचक समजल्या जाणार्‍या प्रणव मुखर्जी यांना इन ऍक्शन उपपंतप्रधान असं म्हटलं जातंय. त्यांना उच्च पद अर्थात पंतप्रधानपदाची इच्छा असल्याचंही या केबलमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यांचे 10 जनपथशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे सरकारमध्येही त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. त्यामुळेच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन प्रणव मुखर्जी यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. मात्र प्रणव मुखर्जी यांच्या बंगाली उच्चारांवर या केबलमध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत.

close