शेतकर्‍यांच्या पॅकेजबाबत 405 अधिकार्‍यांचे निलंबनाचे आदेश

March 21, 2011 10:46 AM0 commentsViews: 1

21 मार्च

राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार करणार्‍या 405 अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या सहा जिल्ह्यांसाठी 150 कोटींचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं होतं. पण पॅकेजच्या अंमलबजावणीत अधिकार्‍यांनी घोटाळा केल्याची कबुली सरकारने विधानसभेत दिली. यासंदर्भात नेमलेल्या गोपाळ रेड्डी समितीने 405 अधिकारी दोषी असल्याचा अहवाल दिला होता. यासंदर्भातला मुद्दा आज सोमवारी विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर सर्व दोषी 405 अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

close