हसन अलीला पुन्हा कोर्टात हजर करणार

March 21, 2011 11:48 AM0 commentsViews: 6

21 मार्च

वादग्रस्त घोडे व्यापारी हसन अलीला सुप्रीम कोर्टानं दिलेली कोठडी आज सोमवारी संपत आहेत. त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. सेशन कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढून अलीला जामीन दिला होता. तर सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करून अलीची ईडीच्या म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे हसन अली बाबत कोर्ट कुठला निर्णय देतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close