मराठी शाळाना मान्यता द्यावी मागणीसाठी आंदोलन

March 21, 2011 12:36 PM0 commentsViews: 2

21 मार्च

राज्यातील मराठी शाळाना लवकरात लवकर मान्यता द्यावी शाळासाठीचा बृहत आराखडा त्वरीत तयार करावा या मागणीकरिता पुण्यात शिक्षण हक्क समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी शाळांच्या मान्यतेच्या प्रश्नासंदर्भात गेले 2 महिने साधी भेट दिली नाही. जर मराठी शाळांना नाकारण्यात आलेली परवानगी लवकरात लवकर दिली नाही तर 4 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा समितीनं दिला.

close