रेल्वे भरती परीक्षा मराठीतून झाल्याच पाहिजेत – मुख्यमंत्री

November 7, 2008 9:54 PM0 commentsViews: 14

8 नोव्हेंबर, मुंबईआशिष जाधवरेल्वेभरती परीक्षांच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात छापल्या जाव्यात. तसंच या परीक्षा मराठी माध्यमातही व्हाव्यात, अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे. ते मुंबई काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.रेल्वेभरतीची परीक्षा द्यायला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेमुळे महाराष्ट्रबरोबरच बिहारमधलं राजकारण ढवळून निघालं. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी तर रेल्वेच्या परीक्षा महाराष्ट्रात होणार नाही असं जाहीर केलं. तर इतर बिहारी नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी उचलून धरली. त्यामुळे अखेर उशीरा का होईना मुख्यमंत्र्यांना मराठी बाणा दाखवावा लागला. मनसेचं आदोलन, रेल्वेची परीक्षा आणि महाराष्ट्राची डागाळलेली प्रतिमा या सर्व मुद्द्यांवर आता मुख्यमंत्री सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत.' सर्व परीक्षांचे पेपर मराठीत असेल तर रेल्वेची परीक्षा मराठीत व्हावं. तसं पत्र केंद्राला पाठवण्यात येईल ' अशी माहिती मुख्यमंत्री विलालराव देशमुख यांनी दिली आहे. तसंच राज्यसरकारनं या परीक्षेची माहिती मागवली होती. ' रेल्वेभरतीची जाहिरात सर्व मराठी पेपरमध्ये आली होती. त्या आधारावर या परीक्षेसाठी 19 टक्के मराठी मुलांनी अर्ज केले होते ' , असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.रेल्वेभरती आंदोलन, मनसे आणि शिवसेनेनं त्यावर केलेलं हिंसक आंदोलन आणि त्यावर रेल्वे भरती परीक्षा महाराष्ट्रात न घेण्याचा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा निर्णय यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका तर घेतली आहे, पण त्यांची ही आक्रमकता केंद्रासमोर किती टिकणार, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

close