पुण्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन

March 21, 2011 1:13 PM0 commentsViews: 2

21 मार्च

साखर, कांदा, दुधावरची निर्यातबंदी हटवावी याकरता शेतकर्‍यांनी पुण्यात धरणं आंदोलन केलं. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील शासकीय कार्यालयं असलेल्या सेंट्रल बिल्डिंग परिसराला घेराव घालण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. पण पोलिसांनी आधीच खबरदारी घेत संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. असून सेंट्रल बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते वाहतूकीकरता बंद ठेवण्यात आले होते.

close