नागपूरमध्ये गोदामाला आग

March 21, 2011 1:20 PM0 commentsViews: 4

21 मार्च

नागपूरच्या गजबजलेल्या गणेशपेठ भागातील स्टायलो पँक या खडर्‌या गोदामाला आज सकाळी आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात कागद असल्याने ही आग लवकर पसरली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 9 गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. अनेक तासानंतर आग आटोक्यात आली यात लाखो रूपयाचा कागद आणि खर्डा आगीत जळून खाक झाला. सुदैवांनी यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच आगीचे कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही.

close