मुंबईच्या तुरुंगातून तब्बल 14 हजार 754 कैदी फरार !

March 21, 2011 2:11 PM0 commentsViews: 6

21 मार्च

मुंबईच्या कारागृहांमधून चौदा हजार 754 कैदी फरार आहेत अशी कबुली गृहमंत्रालयानं दिली आहे. जेलमधून जामीन आणि पॅरोलवर सुटलेले हे सर्व कैदी अद्याप फरार असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. सुभाष चव्हाण, हुसैन दलवाई, चरणसिंग सप्रा यांनी दाखल केलेल्या एका तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. तसेच यावर काय कारवाई करण्यात आली या प्रश्नाला उत्तर देताना गृहविभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत कारवाई सुरु असल्याचं उत्तरही आर.आर.पाटील यांनी दिलं.

close