हसन अलीविरुद्ध खटल्यात सहभागी होण्याची देशभ्रतार यांची इच्छा

March 21, 2011 4:02 PM0 commentsViews: 1

21 मार्च

हवाला प्रकरणातील आरोपी हसन अली खान याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. या प्रकरणात हसन अली याच्यावर प्रथम कारवाई करणारे पोलीस उपायुक्त अशोक देशभ्रतार हे सहभागी होणार आहेत.आपल्याकडे हसन अली याच्या विरोधात अनेक पुरावे आहेत ते आपल्याला सुप्रीम कोर्टात सादर करायचे आहेत असं देशभ्रतार यांचं म्हणणं आहे. हसन अली याच्या विरोधात बोगस पासपोर्ट प्रकरणात पासपोर्ट कार्यालयाने तक्रार केली होती. त्याचा तपास वरळी पोलिसांकडे पर्यायाने विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांच्याकडे होता. दरम्यान, हसन अलीला आणखी तीन दिवसांची ईडीची कोठडी सुप्रीम कोर्टानं सुनावली आहे.

close