मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी डंकन आणि वॉटरला 6 वर्ष तुरुंगवास

March 21, 2011 4:07 PM0 commentsViews: 2

21 मार्च

मुंबईतील अँकरेज या संस्थेतल्या 5 लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डंकन ग्रँट आणि ऍलन वॉटर हे दोन ब्रिटिश नागरिकांना आज अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं त्यांची शिक्षा दोन दिवसांपूर्वी कायम केली होती. 2001 साली गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते फरार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 2002 साली आंतराष्ट्रीय वॉरंट जारी करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

close