जैतापूरवासियांनी मुंबईत काढला मोर्चा

March 21, 2011 4:11 PM0 commentsViews:

21 मार्च

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध नोंदवण्यासाठी जैतापूरवासियांनी मुंबईत आंदोलन केले आहे. लोअर परेल परिसरात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात वैशाली पाटील, प्रकाश रेड्डी यांनी जैतापुर प्रकल्पाच्या विरोधासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट केली. जपानमधील भूकंप आणि त्सुनामीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील अणूप्रकल्पांवर असे संकट येणार नाही याची काय खात्री असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा वैशाली पाटील यांनी दिला.

close